संगमनेर: आक्षेपार्ह घोषणा, दोघांवर गुन्हा दाखल
Breaking News | Sangamner: मशाल यात्रा जात असताना यात्रेतील अज्ञात तरुणांनी अन्य धर्मिय तरुणांना पाहून समाजाच्या भावना दुखविणाऱ्या आक्षेपार्ह घोषणा.
संगमनेर: शहरातील नवघर गल्ली येथून अखंड भारत संकल्प दिन मशाल यात्रा जात असताना यात्रेतील अज्ञात तरुणांनी अन्य धर्मिय तरुणांना पाहून समाजाच्या भावना दुखविणाऱ्या आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात तरूणांविरूद्ध शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.
गुरूवार (दि. १४ ऑगस्ट) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास शहरातील नवघर गल्ली लिंक रोडवरुन अखंड भारत संकल्प दिन मशाल यात्रा जात होती. यावेळी अलफैज शफिक बेपारी (२६), मिर्झा सालार खलिद व अबुबकर युसूफ शेख हे तिघे उभे होते. त्यांना पाहून संकल्प यात्रेतील अज्ञात दोन तीन तरुणांनी आक्षेपार्ह घोषणा दिल्या.
यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याने या तरुणांविरोधात अलफैज शेख यांनी शहर पोलिसात शुक्रवारी सायंकाळी तक्रार दिली.
Web Title: Offensive declaration, case filed against both
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study