अहमदनगर: तरुणाच्या त्रासाला कंटाळून नर्सची आत्महत्या, एकतर्फी प्रेमातून घटना
Ahmednagar News: एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून परिचारिका हिने वसतिगृहाच्या रूममध्ये दोरीने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
अहमदनगर: येथील जिल्हा शासकीय रूग्णालयातील वसतिगृहात 18 जून रोजी परिचारिकेने केलेल्या आत्महत्येचे कारण समोर आले आहे. एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून परिचारिका ऋतिका पांडुरंग आंधळे (वय 19 रा. जिरेवाडी ता. पाथर्डी) हिने वसतिगृहाच्या रूममध्ये दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, तिचे वडिल पांडुरंग त्रिंबक आंधळे (वय 45) यांनी सोमवारी (दि. 19) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मयत ऋतिका आंधळे हिला आत्महत्येस प्रवृत्त करणारा तरुण गोकुळ अण्णासाहेब हिंगे (रा. मुंगूसवाडी ता. पाथर्डी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ऋतिका सन 2021 पासून जिल्हा शासकीय रुग्णालयात परिचारिकेचा कोर्स करत होती. ती वसतिगृहात राहत होती.
गेल्या फेब्रुवारी महिन्यात तिने तिच्या आई- वडिलांना फोन करून सांगितले होते की, गोकुळ अण्णासाहेब हिंगे हा सतत माझ्या मोबाईलवर फोन, मेसेज करून मला तु खुप आवडते, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु माझ्या प्रेमाचा स्वीकार केला नाही तर माझ्याकडे आपले काही फोटो आहे, ते मी एडीट करून सोशल मीडियावर टाकीन व तुझी बदनामी करीन, तुला गावात, समाजात तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही’, अशी धमकी देत आहे. वारंवार फोन, मेसेज करत आहे. यानंतर फिर्यादी पांडुरंग, त्यांची पत्नी, मुलगा व भाच्याने गोकुळ हिंगे याला समजावून सांगितले होते. तरीही गोकुळे हिंगे याने ऋतिका हिला त्रास देणे सुरूच ठेवले. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
Web Title: Nurse’s suicide due to the suffering of young man, incident due to one-sided love
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App