Home संगमनेर संगमनेर तालुक्याला त्रास देणाऱ्यांना आता माफी नाही: आ.बाळासाहेब थोरात

संगमनेर तालुक्याला त्रास देणाऱ्यांना आता माफी नाही: आ.बाळासाहेब थोरात

Maharashtra Assembly Election 2024 | Balasaheb Thorat vs Radhakrishana Vikhe Patil: दहशत नेमकी कोणत्या तालुक्यात आहे, याचाही फैसला करावा.

no forgiveness for those who have troubled Sangamner taluka Assembly Election

 संगमनेर:  विधानसभा निवडणुकीत शिर्डी आणि संगमनेर हे दोन्ही मतदारसंघ महाराष्ट्राचे केंद्रबिंदू बनले आहेत. संगमनेर तालुक्यात दहशत असल्याचा, विकास न झाल्याचा आरोप केला जातो. विधानसभा निवडणुकीत संगमनेर आणि शिर्डी या दोन्ही मतदारसंघांत आता जनताच न्यायाधीश होईल. या दोन्ही तालुक्यांतील विकासकामांची जनतेने तुलना करावी. दहशत नेमकी कोणत्या तालुक्यात आहे, याचाही फैसला करावा, असे आवाहन काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता आमदार थोरात म्हणाले की, त्यांना दोनदा जिल्हा परिषदेच्या, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची संधी दिली. मात्र, ते विसरून गेले. संगमनेर तालुक्यात दहशतीचे एक तरी उदाहरण दाखवा, निळवंडे धरणाचे पाणी मी आणले. तुम्ही फक्त सोडण्याचे काम केले. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना निळवंडे धरणाचे पाणी सोडायलाही तुम्ही नेले नाही. निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज तुम्हीच केला. पक्ष बदलला की, त्यांचे तत्त्वज्ञान बदलते. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. त्यांनी ६० वर्षांमध्ये कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही. केवळ विकासाला खोडा घातला.

निवडणुकीतील समोरचा उमेदवार हा मुख्य खबऱ्या आहे, तू आता जनतेच्या कचाट्यामध्ये सापडला आहे त्याचा बंदोबस्त आपण मतपेटीतून कराच, असे आवाहन करताना धांदरफळ येथील घटना अत्यंत दुर्दैवी होती. महिलांचा अपमान होत असताना त्यावेळी जनतेसमोर तुम्ही टाळ्या वाजवल्या या घटनेला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात. अडीच वर्षात तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करून त्रास दिला. गोरगरीब आणि मजुरांच्या अन्नात माती कालविली. तालुक्याला त्रास देणाऱ्यांना आता माफी नाही. दहशतवादी प्रवृत्ती रोखण्यासाठी उमेदवार कोण हे न पाहता त्याच्या मागची प्रवृत्ती पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

‘संगमनेरमधील भाजपच्या नेत्यांना विचारा निवडणूक झाल्यानंतर आम्ही कधी राजकारण केलं?’ असा सवाल करत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे पाटलांवर तोफ डागली आहे. ते म्हणाले, ‘शिर्डी मतदारसंघात विकास करण्यासाठी काम करायचा आहे तर होऊन जाऊ द्या तुलना. दोन्ही व्यक्तिमत्व दोन्ही तालुके विकास आणि जनता न्यायालयात सगळं मांडू असं म्हणत थोरात यांनी विखेंना आव्हान दिला आहे. ज्यावेळी धांदरफळमध्ये वक्तव्य झालं त्यावेळी तुम्ही टाळ्या वाजवत होतात. नंतर पंधरा मिनिटात लोक आले की म्हणालात आमच्यावर हल्ला करण्याचा कट होता. सुजय विखे ला विचारा महिला गेल्या आणि तो महिलांचा अवतार पाहून सुजय पळून गेले. तुम्ही जर मर्द होतात तर पळाले कशाला… ‘असा टोलाही थोरात यांनी लगावला.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे  यांनी सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या प्रचार सभेतून ते बोलत होते. 

सत्यजीत तांबे म्हणाले की, ही संगमनेर तालुक्याच्या स्वाभिमानाची सभा आहे. एकमेकांच्या पायात पाय न घालण्याची परंपरा असलेला हा तालुका आहे. जाती, धर्म, भेद कधीही न समजलेला हा तालुका आहे.  मात्र गेल्या काही दिवसांपासून काही लोक येतात आणि आपल्या लोकांना डिवचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 1999 पासून थोरात साहेबांच्या प्रचारासाठी मी काम करत आहे. पण आजपर्यंत इतक्या खालच्या पातळीच राजकारण मी कधीही पाहिलं नाही. पुढचे 50 वर्षे या तालुक्याकडे नजर उचलण्याची हिंमत होणार नाही, अशी ही निवडणूक होईल. 

Web Title: no forgiveness for those who have troubled Sangamner taluka Assembly Election

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here