निळवंडे धरणातून आजपासून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरु
अकोले | Nlwande Dam: आज दि. २५/११/२०२१ रोजी सकाळी ७:०० वा निळवंडे धरणातून १३०० क्युसेक्स विसर्गाने भंडारदरा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रासाठी बिगर सिंचन / पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आलेले आहे . सद्यस्थितीत धरणांचे पाणीसाठे
भंडारदरा- ११०३९ दलघफू व
निळवंडे – ८००९ दलघफू आहेत.
सदर आवर्तन अंदाजे ४-५ दिवस सुरू राहणार असुन साधारणत: ३००-३५० दलघफू पाणीवापर होईल असा अंदाज आहे. अशी माहिती इंजिनियर हरिश्चंद्र चकोर यांनी दिली आहे.
Web Title: Nlwande Dam Drinking water cycle starts from today