अकोले तालुक्यात दोन मोटारसायकलींच्या धडकेत एक जण ठार
राजूर: अकोले तालुक्यातील मान्हेरे येथे दोन मोटारसायकलमध्ये समोरासमोर धडक झाल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दिनांक २३ मे रोजी घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अकोले तालुक्यातील मान्हेरे शिवारात दोन मोटर सायकलींची समोरा समोर धडक होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. भारत नामदेव मेंगाळ वय २४ राहणार खडकाचीवाडी देवठाण या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. राजूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धडक दिलेला दुसरा व्यक्ती हा फरार झाला असून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा: संगमनेर तालुक्यात दारू पिणाऱ्या पतीस पत्नी व मुलाकडून मारहाणीत मृत्यू
पुढील तपास राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तळपे हे करीत आहे.
Website Title: News One killed in Accident of two motorcycles in Akole taluka