प्रेमाचे संबंध करून वेळोवेळी शारीरिक संबंध करून गर्भवती ठेवले, गुन्हा दाखल
अकोले: अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमाचे संबंध ठेवून तिच्याबरोबर वेळोवेळी शारीरिक संबंध करून तिला गर्भवती ठेवल्याप्रकरणी तालुक्यातील निळवंडे येथील मच्छिंद्र संजय मेंगाळ याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार १ मे २०१९ ते २० मार्च २०२० पूर्वी अकोले तालुक्यातील शेरणखेल येथे शांताराम कासार यांच्या शेतात आरोपी मच्छिंद्र मेंगाळ रा. निळवंडे याने फिर्यादी ही अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. असे सांगून तिच्यासोबत प्रेमाचे संबंध जोडले व तिच्याबरोबर वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. मात्र काही दिवसांनी फिर्यादीचे पोट दुखू लागल्याने तिने सर्व आई वडिलांना सांगितले. त्यांनतर आई वडिलांनी २० मार्च २०२० रोजी सोनोग्राफी तपासणी केली असता फिर्यादी ही आरोपीकडून ५ महिन्याची गर्भवती आहे असा अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे हे करीत आहेत.
Website Title: News love affair pregnant by physical contact in Akole taluka