संगमनेर शहरात आणखी दोन करोना बाधित एकूण ५५
संगमनेर: अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून आज अहवाल प्राप्त झाले त्यात संगमनेर शहरातील दोघांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संगमनेर येथील करोनाबाधितांची संख्या ५५ झाली आहे. आज अहमदनगर जिल्ह्यात सहा जणांना करोनाची लागण झाली आहे तर ६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोल्हेवाडी रोड येथील 18 वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाल्याची स्पष्ट झाले आहे तर नवघर गल्ली येथील ३२ वर्षीय युवकाला करोनाची लागण झाली आहे. हे दोघेही मागील बाधितांच्या संपर्कात आल्याने संक्रमित झाले आहेत.
अहमदनगर जिल्ह्याची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यातील एकूण करोना बाधितांची संख्या १८३ झाली आहे. नगर शहरातील लालनगर, नेप्तीनाका केडगाव येथील 50 वर्षीय महिला, शेवगाव तालुक्यातील रानेगाव येथीळ 32 वर्षीय तरुण, पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील 10 वर्षीय मुलगाही पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर लालबाग येथून घुलेवाडी(पारनेर) येथे आलेली 28 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
Website Title: Coronavirus update Ahmednagar Sangamner Taluka