कोतूळ येथे हळदी कुंकू कार्यक्रम वरदविनायक देवस्थानच्या वतीने पार
कोतूळ(News): सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या कोतूळ ता.अकोले येथील श्री वरदविनायक देवस्थान व जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळ महिला विभाग यांच्या वतीने हळदी कुंकू,तिळगुळ वाटप व गणेश भक्तांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते .या वेळी महिलांना वाण म्हणून पूजा साहित्याचे वाटप करण्यात आले.
पारंपारिक सणांना आधुनिकतेची झालर चढली असली तरी आपल्या संस्कृतीचे व प्रथा परंपराचे जतन व्हावे या साठी सामुदाईक स्वरुपात श्री वरदविनायक देवस्थानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला.सर्व समाजातील महिला यात सहभागी झाल्या होत्या.देवस्थानच्या वतीने वाणा बरोबर श्री गणेशाचे स्टिकर,चहा,पोहे याचे वाटप करण्यात आले.
वाचा: संगमनेर: उसाचा ट्रक जागीच पलटी
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी द्वारका पोखरकर, प्रज्ञा भाटे,वर्षा नेवासकर,प्रियंका पाटील,वंदना पाठक,स्नेहल राउत,वृषाली समुद्र,प्रियांका नेवासकर,सुरखा साळुंके,शुभांगी खाडे,मिना आरोटे,विद्या परशुरामी,सविता घाटकर,अनिता पाठक,आदींनी विशेष प्रयत्न केले.
Website Title: News kunku program was passed on behalf of Vardavinayak Devasthan