शिर्डी(News): शिर्डी येथे संभाजीनगरमध्ये पत्नीवर चाकूने वार करत पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जखमी महिलेला परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने पत्नीचे प्राण वाचले आहे. काही दिवसांपासून लॉकडाऊनमुळे सर्वत्र शांतता असतानाच हा प्रकार शिर्डीत घडल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिर्डी येथील संभाजीनगर भागात राहणारे कैलास दिवाकर ठोकळ (वय ५०) व अनिता कैलास ठोकळ (वय ४५) या पती पत्नीत शुक्रवारी रात्री भांडण झाले. या भांडणात वाद विकोपाला गेला. पती कैलास याने पत्नी अनितावर चाकूने वार केला. चाकू लागल्याने त्यात अनिता जबर जखमी होऊन खाली पडली. हे पाहताच स्वतः कैलास ठोकळ याने दोरीने आपला गळफास घेत जीवन संपविले. मात्र आई जबर जखमी झाल्याने मुलगा चंद्रकांतने आरडाओरडा केला. त्यामुळे आसपासचे लोक जमा झाले. त्यांनी जखमी अनिता यांना श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. ठोकळ पती पत्नीत नेहमीच वाद होत असत मात्र या हल्यातून अनिताचे प्राण वाचले. याबाबत शिर्डी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
Website Title: News Husband commits suicide