Home अहमदनगर अहिल्यानगर: तरुणचा कालव्यात बुडून मृत्यू

अहिल्यानगर: तरुणचा कालव्यात बुडून मृत्यू

Breaking News | Ahilyanagar: मुळा उजव्या कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Nevasa Youth drowned in canal

नेवासा: नेवासा तालुक्यातील देवगाव येथील आदिनाथ दगडू निकम (वय 33) या तरुणाचा मुळा उजव्या कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या मुळा उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. मंगळवार दि.31 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आदिनाथ दगडू निकम हा कालव्यालगत असलेल्या शेतामध्ये कामासाठी गेला होता, काम आटपून तो हातपाय धुण्यासाठी कालव्याकडे गेला असता पाय घसरून तो पाण्यात पडला. कालव्यापासून काही अंतरावर असलेला त्याचा चुलत भाऊ नितीन रावसाहेब निकम, सुनील अंबादास निकम यांच्या ही बाब निदर्शनास आली.

त्यांनी तत्काळ पाण्यात उड्या मारल्या. परंतु तोपर्यंत वाहत्या पाण्यामध्ये आदिनाथ लांबवर वाहून गेला होता. त्या दोघांनी त्याचा खूप शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही. पाण्यात बुडाल्याच्या जागेपासून सातशे ते आठशे फूट अंतरावर तो पोटचारीच्या बार्‍याजवळ एका पाईपला अडकलेला आढळून आला. आदिनाथ हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यास सात वर्षांची एक मुलगी तर पाच वर्षांचा एक मुलगा आहे. या दुर्दवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Nevasa Youth drowned in canal

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here