Rape: महिलेवर चौघांनी केला बलात्कार, चौघांवर गुन्हा
नेवासा | Rape: नेवासा तालुक्यातील एका महिलेवर रामडोह येथील चार जणांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुपारच्यावेळी शेतात झाडाखाली झोपलेल्या महिलेवर चौघांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या आधी तीन महिन्यापूर्वीही या चौघांनी सदर महिलेवर आळीपाळीने बलात्कार (Rape) केला होता असे फिर्यादीत म्हटले आहे.
सदर महिलेच्या फिर्यादीवरून संतोष अण्णासाहेब गढेकर, शिवाजी पंढरीनाथ घुले व ऋषिकेश काकासाहेब गोरे व संदीप गोरख आगळे सर्व रा. रामडोह ता. नेवासा या चौघांवर नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 376(ड), 327, 456, 506, 507 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Nevasa woman was rape by four people