अशोक कारखान्याचे मा.संचालक यांच्या घरावर दरोडा, लाखो लंपास
Ahmednagar | नेवासा | Nevasa News: नेवासा तालुक्यातील पुनतगाव पाचेगाव रस्त्यालगत शेतीत वस्ती करून राहणारे अशोक कारखान्याचे मा.संचालक मच्छिंद्र सुखदेव वाकचौरे व त्याचा पुतणे प्रसाद विठ्ठल वाकचौरे यांच्या घरावर रात्री पावणे तीन सुमारास सहा दरोडेखोराने दरोडा टाकल्याची घटना घडली आहे.
या दरोड्यात जवळपास साडे तीन तोळे सोने व अठरा हजार रोख रक्कम तसेच सात भार चांदी लंपास केल्याची माहिती समोर येत आहे. नेवासा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटना स्थळी भेट देऊन सदर घटनेची माहिती घेतली. घटनास्थळी शवनपथक पचारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणताही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तरी पुढील तपास नेवासा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार हे करीत असल्याचे समजते.
Web Title: Nevasa Robbery at director’s house