शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने डोक्यात वार करून खून
नेवासा | Nevasa: नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे शेत बांधाच्या वादातून एकाने कुऱ्हाडीने वार करत एकाचा खून केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाच जणांविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय लक्षमण ठोंबरे रा. गोधेगाव ता. नेवासा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. महेंद्र उर्फ महेश गु;गुलाबराव भिंगारदे याने ठोंबरे यांच्या शेतजमिनीच्या वादाच्या रस्त्यावर मुरुमाचे ढपर खाली केले. त्याचे रस्त्यावर ढीग पडलेले होते. त्यामुळे ज्ञानेश्वर व दत्तात्रय ठोंबरे हे ट्रक्टर घेऊन ढीग दूर करीत होते. यावेळी अक्षय महेश भिंगारदे व भूपेंद्र महेश भिंगारदे हे दोघे आले. त्यांच्याकडे लाकडी दांडा व कुऱ्हाड होती. त्यांनी मुरूम पसरविण्यास विरोध करत शिवीगाळ केली. त्यानंतर राजेंद्र वसंतराव भिंगारदे, कोमल भिंगारदे, महेश भिंगारदे हे येऊन शिवीगाळ केली व दत्तात्रय यांना खाली पाडून कुऱ्हाडीने डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारहाण केली. त्यामध्ये त्यांचे डोके फुटले. त्यांना उपचारासाठी नेवासा पहाता येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना नगर येथे हलविण्यात आले मात्र उपचार सुरु असताना दत्तात्रय ठोंबरे यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी वरील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Nevasa Murder by stabbing in the head