Home अहमदनगर अल्पवयीन मुलीचा विनयभंग, ठार मारून टाकण्याची धमकी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, ठार मारून टाकण्याची धमकी

Nevasa Molestation of a minor girl

नेवासा | Nevasa: नेवासा तालुक्यातील वाकडी येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग व जीवे ठार मारण्याची धमकी  दिल्याची  घटना काल घडली आहे.

याप्रकरणी आरोपी आदिनाथ तुकाराम काळे याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीने फिर्याद दाखल केली आहे.

वाकडी गावातील आरोपी आदिनाथ तुकाराम काले याने ती शाळेत जात येत असताना तिचा मोटारसायकलवरून पाठलाग केला तू माझ्यासोबत मैत्री कर तसेच तु माझ्यासोबत लग्न कर असे म्हणाला त्यावर मुलीने विरोध केला असता तुझे लग्न होऊ देणार नाही. तसेच तु नाही म्हणालीस तर तुझे तोंड दाबून तुला जीवे ठार मारून टाकीन अशी धमकी दिली.

याप्रकरणी मुलीचे घरचे त्या त्यास समजावून सांगण्यास गेले असता त्यांनाही आरोपीने शिवीगाळ व दमदाटी केली. आरोपी हा गुन्हा करून फरार झाला होता. पोलिसांना गुप्त माहितीद्वारे माहिती मिळताच  पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले आहे.  

Web Title: Nevasa Molestation of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here