Home अहिल्यानगर उसाच्या शेतात स्त्री जातीचे अर्भक, परिसरात खळबळ

उसाच्या शेतात स्त्री जातीचे अर्भक, परिसरात खळबळ

Nevasa Female infants in sugarcane fields

नेवासा | Nevasa: नेवासा तालुक्यातील कौठा शिवारात विहिरीजवळ असलेल्या उसाच्या शेतात नुकतेच जन्मलेल्या स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत नवजात अर्भक गतप्राण झाले. त्यास मयत घोषित करण्यात आले. या घटनेची पोलिसांनी तातडीने चौकशी करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

कौठा महालक्ष्मी हिवरा रोडवरील शिवारात जमीन असलेले संभाजी बोरकर हे आपल्या उसाच्या शेतात पाणी भरण्यासाठी सकाळीच गेली असता त्यांना ही बाब निदर्शनास आली. अचानक समोर नवजात अर्भक पहिल्याने बोरकर एकदम घाबरूनच गेले. त्यांनी ही खबर सोनई पोलीस स्टेशन, आरोग्य विबहाग व गावतील नागरिकांना दिली.

नुकतेच जन्मलेले हे स्त्री जातीचे अर्भक काही काळ जिवंत होते. मात्र त्यानंतर काही वेळातच गतप्राण झाले. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बाळ टाकून दिल्याने डोक्याला मार लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी पोलीस पथक घटनास्थळी पाठविण्यात आले.

Web Title: Nevasa Female infants in sugarcane fields

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here