मोठी बातमी! नगर जिल्ह्यातील “या” आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात…..
Breaking News | Akole Accident: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना.
अकोले: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील विठे घाटात हा अपघात झाला आहे.
अकोले येथून राजूरकडे जाताना ट्रकची आणि कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये आमदार किरण लहामटे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. दैव बलवत्तर म्हणून आमदार लहामटे थोडक्यात बचावले.
आमदार किरण लहामटे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यानंतर लहामटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर आमदार लहामटे राजूर येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत.
दैव बलवत्तर म्हणून आमदार लहामटे थोडक्यात बचावले. कारण कारण आणि ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाली होती. यामध्ये आमदार किरण लहामटे यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.
आ.डॉ. किरण लहामटे हे अकोलेहून राजूरकडे जात असताना विठे घाटात त्यांच्या फॉर्च्यूनर (क्रमांक एमएच. १७, डीएफ. ९९९१) या वाहनास चुकीच्या बाजूने येणाऱ्या ट्रक (क्रमांक एमएच. १७, टी. ८४९६) ने समोरुन धडक दिली. आमदार लहामटे यांचे तालुक्यातील राजूर येथे निवासस्थान आहे. काल मंगळवारी दुपारी अकोले येथून ते राजूरला चालले होते. अकोलेपासून सुमारे १० किमी अंतरावरील विठे घाटात त्यांच्या गाडीला हा अपघात झाला. या अपघातात डॉ. लहामटे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी त्यांच्यासह गाडीमधील सर्वजण बचावले. अपघाताचे वृत्त समजताच चौकशीसाठी आमदारांचा फोन खणखणू लागला. अनेक कार्यकत्यांनी राजूर येथे धाव घेतली
Breaking News: Nationalist Congress Ajit Pawar Gatache MLA Kiran Lahamte’s car acciden