अहिल्यानगर: मध्यरात्री अल्पवयीन मुलीचे अपहरण
Breaking News | Ahilyanagar: एका अल्पवयीन मुलीचे तीच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली.
राहुरी: राहुरी तालुक्यातील पुर्व भागातून एका अल्पवयीन मुलीचे तीच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत अज्ञात इसमा विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, ६ मे रोजी अल्पवयीन मुलगी व घरातील इतर लोक जेवण करुन झोपी गेले होते. दि. ७ मे रोजी पहाटे १ वाजेदरम्यान मुलीची आजी पाणी पिण्यासाठी उठली. तेव्हा मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे दिसून आले. नातेवाईकांनी मुलीचा परिसरात शोध घेतला. मात्र ती कोठेही आढळून आली नाही. तीला अज्ञात इसमाने आमिष दाखवून अज्ञात कारणासाठी पळवून नेले, अशी नातेवाईकांची खात्री झाली. त्यानंतर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) प्रमाणे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.
Breaking News: Midnight kidnapping of minor girl