Home संगमनेर नाना पटोले : भाजपकडून इंग्रजांनी आणलेल्या धोरणाची अंमलबजावणी

नाना पटोले : भाजपकडून इंग्रजांनी आणलेल्या धोरणाची अंमलबजावणी

Nana Patole in Sangamner: आमच्या विरोधात जो बोलेल, त्याच्यावर कारवाई करू या इंग्रजांनी आणलेल्या धोरणाची अंमलबजावणी.

Nana Patole Implementation of the policy brought by the British from the BJP

संगमनेर : आमच्या विरोधात जो बोलेल, त्याच्यावर कारवाई करू या इंग्रजांनी आणलेल्या धोरणाची अंमलबजावणी भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई नवीन नाही, हा दबाव त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी आहे. अजून किती लोकांना जेलमध्ये टाकायचे. हे भारतीय जनता पक्षाने ठरवावे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरील सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले रविवारी (दि. ३१) संगमनेरात आले होते. येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. कॉंग्रेस नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे आदी यावेळी उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, भारतीय जनता पक्ष भारतातील लोकशाहीला सोप्या पद्धतीनं हलवू शकणार नाही. येणान्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार, यात दुमत नाही.

आपले पाप लपविण्यासाठी अशी कारवाई करणे, हे काही नवीन नाही. अग्निपथ योजनेतील तरुणांचा उद्रेक वाढल्यानंतर लगेच ईडी कार्यालयात बोलावून वातावरण बदलले गेले. मूळ विषयाला बगल देण्यात भारतीय जनता पक्ष एक्सपर्ट आहे. राज्यपालांनी जो खंजीर महाराष्ट्राच्या पाठीत खुपसला, जो घाव केला. त्याला जनता कधी विसरणार नाही. राज्यासलांनी कार्यालयात भाजप कार्यालय घडले आहे. भाजपचे कटकारस्थान जनतेला कळायला लागलं आहे. धनुष्यबाण गोठविण्याचे काम आता ते करणार आहेत. एका पक्षाला संपवून आम्ही कसे जिवंत राहू, अशा पद्धतीचे राजकारण ७५ वर्षात कोणी केले नाही. हे खालच्या पातळीचे व लोकशाहीला घातक राजकारण केंद्रातील भाजप सरकार करते आहे, हे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Nana Patole Implementation of the policy brought by the British from the BJP

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here