Home मनोरंजन Nagraj Manjule: नागराज मंजुळे अण्णांनी केली नव्या सिनेमाची घोषणा, चाहत्याची उत्सुकता

Nagraj Manjule: नागराज मंजुळे अण्णांनी केली नव्या सिनेमाची घोषणा, चाहत्याची उत्सुकता

Nagraj Manjule: नागराज मंजुळे अण्णांनी केली नव्या सिनेमाची घोषणा.

Nagraj Manjule Anna announced a new movie

Nagraj Manjule:  नागराज मंजुळे हे एक अफलातून व्यक्तिमत्त्व. नागराज हे एक संवेदनशील कवी आहेत. तितकेच उत्तम दिग्दर्शक आणि उत्तम अभिनेते आहेत. त्यामुळे नागराजचा सिनेमा येणार म्हटलं की, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. आता नागराज यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, नागराज एका गाजलेल्या चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात सीक्वल घेऊन येत आहेत. या सिनेमाचं नाव काय तर ‘नाळ 2’.

नागराज यांचा ‘नाळ’ हा सिनेमा प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला होता. या चित्रपटाची कथा, संवाद, गाणी प्रेक्षकांना भावली होती. या चित्रपटात श्रीनिवास पोकळे या बालकलाकाराने चैत्याची भूमिका साकारली होती. देविका दफ्तारदार यांनी त्याच्या आईची आणि खुद्द नागराज यांनी चैत्याच्या वडिलांची भूमिका वठवली होती. याच चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नागराज यांनी एक पोस्ट शेअर करत या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, ‘नाळ 2’चं (Naal 2) शूटींगही सुरू झालं आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्स्चुकता शिगेला पोहोचली आहे.

मागच्या महिन्यात सुधाकरने अचानक फोन करून सांगितलं की नाळचा दुसरा भाग लिहिलाय. ऐकवायला कधी भेटुयात ?

नाळ चा दुसरा भाग काय होऊ शकतो याबाबत माझ्याही मनात उत्सुकता तयार झाली. स्क्रिप्ट ऐकली ती इतकी अनपेक्षित तरीही सहज नि भारी होती की दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी फिल्मचं शूटिंग झटक्यात सुरू केलं.

पहिल्या “नाळ” प्रमाणेच

‘नाळ’चा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे !

“नाळ 2” च्या नावानं चांगभलं !!!

Web Title: Nagraj Manjule Anna announced a new movie

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here