Home अहिल्यानगर अहिल्यानगर: यात्रेच्या दिवशीच विजेच्या धक्क्याने माय लेकाचा मृत्यू

अहिल्यानगर: यात्रेच्या दिवशीच विजेच्या धक्क्याने माय लेकाचा मृत्यू

Breaking News | Ahilyanagar Accident: घराचे छत पाण्याने धूत असताना अचानक विजेचा धक्का बसून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू.

My daughter died of electric shock

श्रीगोंदा: गावाची यात्रा असल्याने घराची साफसफाई करण्यासाठी घराचे छत पाण्याने धूत असताना अचानक विजेचा धक्का बसून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथे घड़ली आहे. राजेंद्र हिरामण लोंढे व सखुबाई हिरामण लोंढेअसे या घटनेत मृत पावलेल्या मायलेकाची नावे आहेत.

तालुक्यातील चांडगाव येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांची दि.२२ एप्रिल २०२५ रोजी यात्रा होती. त्यामुळे घरातील साफसफाई करण्यासाठी राजेंद्र हिरामण लोंढे यांनी घरातील आवरा आवर करुन घराचे छत पाण्याने धुत असताना विजेची वायर असलेल्या लोखंडी ग्रीलला त्यांचा हात लागला. त्यात त्यांना विजेचा धक्का बसला व ते खाली कोसळले यावेळी जवळ असलेल्या आई सखुबाई हिरामण लोंढे यांनी मुलाला खाली पडलेला पाहून त्यांनी ओरडत मुलाला वाचवण्यासाठी धावुन गेल्या. मात्र मुलाला ओढताना त्यांनाही विजेचा धक्का बसला हा आवाज ऐकून घरातील इतरही सदस्य छतावर धावून गेली, घटना लक्षात आल्यावर राजेंद्र लोंढे यांच्या पत्न ीने विद्युत वायर कट केली त्या नंतर दोघा मायलेकांना ताबडतोब श्रीगोंदा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. या घटने बाबत श्रीगोंदा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

यात्रेच्यादिवशीच चांडगावावर पसरली शोककळा

गावाची यात्रा असल्याने आणि घडलेल्या या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. यात्रेच्या दिवशीच अशी दुर्दैवी घटना घडल्याने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गावातील यात्रे निमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यांच्या मागे वडील, भाऊ, पत्नी, भावजय, चार बहिणी व दोन मुले असा परिवार आहे.

Web Title: My daughter died of electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here