संतापजनक; आईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या नराधमाचा मुलीवर बलात्कार
Nagpur Crime News : आईसोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आरोपी तरुणानं तिच्या मुलीवरच जबरदस्तीनं बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना. तरुण मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार (Abused).
नागपूर: तरुणीच्या आईसोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आरोपी तरुणानं तिच्या मुलीवरच जबरदस्तीनं बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून आरोपी तरुण मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करत होता. परंतु आता तरुणीनं याबाबतची माहिती तिच्या आईला दिल्यानंतर घटनेचा भांडाफोड झाला आहे. त्यामुळं आता पोलिसांनी या प्रकरणात तातडीनं कारवाई करत आरोपीला काही तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहे. काही दिवसांपूर्वीच नागपुरात एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरात एक महिला अमोल घरडे या तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. परंतु आरोपी अमोलने महिलेच्या मुलीलाही प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. महिलेशी प्रेमसंबंध असतानाही अमोलनं तिच्या मुलीशी अनैतिक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून अमोल जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर सातत्यानं बलात्कार करत होता. प्रेयसी महिला गावी गेली असता आरोपी अमोलनं संधी साधून तिच्या मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यासाठी तरुणीनं नकार दिल्यानंतर अमोलनं तिला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर पीडितेनं घडलेला सारा प्रकार आईच्या मैत्रिणीला सांगितला. त्यानंतर पीडितेनं आरोपी अमोलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी
याशिवाय आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती समजताच महिलेनं तात्काळ नागपूर गाठलं. त्यानंतर तक्रार दाखल केल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी काही तासांच्या आत आरोपी अमोलला अटक केली असून पुढील कार्यवाही केली जात आहे. या घटनेने नागपुरात खळबळ उडाली आहे.
Web Title: murderer living in a live-in relationship with her mother rape her daughter
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App