Home क्राईम शेतातून दूध घेऊन परतणाऱ्या तरुणाचा निर्घृण खून; मृतदेह आढळल्याने खळबळ

शेतातून दूध घेऊन परतणाऱ्या तरुणाचा निर्घृण खून; मृतदेह आढळल्याने खळबळ

Bhandara Crime: तरुण शेतातून दूध घेऊन घराकडे येत होता. मात्र वाटेतच त्याची निर्घृणपणे हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. शेतात मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ.

the murder of youth returning from farm with milk Excitement after the Dead body was found

भंडारा: शेतातून परतणाऱ्या तरुणाची हत्या झाल्याने भंडाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. हा तरुण शेतातून दूध घेऊन घराकडे येत होता. मात्र वाटेतच त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेतली आहे.

रामपूर गावालगतच्या शेतात मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. प्रदीप लक्ष्मण धांडे (35) असे मृत तरुणाचे नाव असल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहाडी तालुक्यातील रामपूर-मांडेसर येथील प्रदीप धांडे हा शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय करत होता. 22 मार्च रोजी संध्याकाळी शेतात बांधलेल्या जनावरांच्या दूध काढण्यासाठी प्रदीप धांडे गेले होते. दूध काढल्यानंतर दुधाची बकेट घेऊन प्रदीप धांडे घराकडे निघाले होते. मात्र बराच वेळ प्रदीप धांडे हे घराकडे न परतल्याने त्यांचा शोध सुरु करण्यात आला.

शोध घेतल्यानंतर गावालगत असलेल्या शेतात प्रदीप यांचा मृतदेह आढळून आला. अज्ञातांनी प्रदीप यांच्या डोक्यावर वार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर याची माहिती मोहाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. तपासामध्ये प्रदीप यांच्याच्या डोक्यावर जखम असल्याने दिसून आले आहे. तर प्रदीप यांची हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: the murder of youth returning from farm with milk Excitement after the Dead body was found

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here