कारने दुचाकीला ७० फूट फरपटत नेलं, काका पुतणीचा दुर्देवी मृत्यू
Accident News: बोलेरो कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात, धडक लागून दुचाकीस्वार काका आणि पुतणीचा दुर्देवी मृत्यू.
वैजापूर: वैजापूर तालुक्यात नागपूर-मुंबई महामार्गावर विरोबा मंदिरा समोर एका बोलेरो कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात धडक लागून दुचाकीस्वार काका आणि पुतणीचा दुर्देवी मृत्यू झाला. धडक एवढी भीषण होती की कारने दुचाकीला फरफटत नेले. नारायण कारभारी शेळके (वय ४५ वर्षे) आणि पूजा वेणुनाथ शेळके (वय २१ वर्षे) यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील नागपूर मुंबई महामार्गावर बिरोबा मंदिर समोर वैजापूरहून पालखेडला दुचाकी क्रमांक MH 20 FE 4061 वरून जात असताना लासूरहून वैजापूरच्या दिशेने येणाऱ्या बोलेरो गाडी क्रमांक MH 25 R 3554 यांची विरोबा मंदिर समोर समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर बोलेरो गाडीने दुचाकीला ७० फूट लांब पर्यंत फरफटत नेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली आहे.
या अपघातात दुचाकीस्वार नारायण कारभारी शेळके व त्यांची पुतणी पूजा वेणूनाठ शेळके हे गंभीर जखमी झाले होते. जखमींना जवळ पास असलेल्या वस्तीवरील राजेंद्र आहेर, गौरव जाधव, अमोल आहेर, नितीन डुकरे, रामभाऊ आदमाने यांच्या सोबत शिवराई येथील काही नागरिकांनी तत्काळ एका खासगी वाहन थांबवत त्याद्वारे उपचाराकरिता वैजापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविले,परंतु डॉक्टरांनी या दोघांना तपासून मृत घोषित केले
घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रज्जाक शेख व संतोष सोनावणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी वैजापूर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपस वैजापूर पोलीस करीत आहे.
Web Title: Accident bike was thrown 70 feet by the car, killing the uncle and nephew
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App