Murder: डोक्यात दगड घालून तरुणाचा खून, गुन्हा दाखल
लोणी | Loni: मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास राहता तालुक्यातील लोणी येथील इरिगेशन कॅनॉलच्या परिसरात कच्चा रोडवर तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती समजताच लोणी पोलिसांनी घटनास्थळी देत तपास सुरु केला.
तपास सुरु केला असता हा मृतदेह अर्जुन अनिल पवार वय २५ रा. बारागाव नांदूर ता. राहुरी याचा असल्याचे उघडकीस आले. पवार याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी अर्जुन पवार याचे मित्र दीपक डोळस व विठ्ठल कावळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांनी अर्जुन पवार याच्या डोक्यात दगड घालून खून केला मात्र कारण अजून समोर आले नाही. या आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास लोणी पोलीस स्टेशनचे समाधान पाटील हे करीत आहे.
Web Title: Murder of Young man at loni