Home नाशिक अनैतिक संबंधातून पत्नीचा खून; मेव्हुण्यावरही कोयत्याने वार

अनैतिक संबंधातून पत्नीचा खून; मेव्हुण्यावरही कोयत्याने वार

Breaking News | Nashik Crime: अनैतिक संबंधातून पतीने पत्नीचा खून (Murder) केल्याची घटना घडली, मेव्हुण्यावरही कोयत्याने वार केले आहेत. याप्रकरणी संशयित पतीला अटक करण्यात आली.

Murder of wife through adultery Brother-in-law was also stabbed

नाशिक : तामसवाडीत (ता. निफाड) अनैतिक संबंधातून पतीने पत्नीचा खून केल्याची समोर आली आहे.  संशयिताने मेव्हुण्यावरही कोयत्याने वार केले आहेत. याप्रकरणी संशयित पतीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गंभीर जखमी पत्नी व मेव्हुण्याला संशयितच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन आला असता, सिव्हिल पोलीस चौकीतील पोलीसांच्या चाणाक्षतेमुळे संशयिताने रचलेला अपघाताचा बनाव उघडकीस आला. मात्र, जखमी मेव्हुण्याच्या फिर्यादीनुसार पती-पत्नीच्या वादातून खून झाल्याचे म्हटले आहे.

मनोज रमेश पोतदार (३३, रा. तामसवाडी, ता. निफाड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी पतीचे नाव आहे. वर्षा मनोज पोतदार (२९) असे मयत विवाहितेचे नाव असून, मेव्हणा लाला बाळू शेवरे(३० रा. तामसवाडी) हा गंभीर जखमी आहे.

जखमी लाला शेवरे याच्या फिर्यादीनुसार, संशयित मनोज यास दारुचे व्यसन आहे. त्यावरून त्याची व पत्नी वर्षा यांच्यात सातत्याने भांडण होत असे. बुधवारी (ता. १३) दुपारीही त्यांच्या वाद झाले असता, त्यावेळी संतापामध्ये संशयित मनोज याने कोयत्याने पत्नी वर्षावर वार केले. यात ती गंभीररित्या जखमी झाले. त्यावेळी बचावासाठी गेलेल्या मेव्हुणा शेवरे याच्यावरही संशयिताने कोयत्याने वार केले. त्यानंतर संशयितानेच दोघा जखमींना चांदोरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, त्यांच्या प्राथमिक उपचार करून नाशिक जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

याठिकाणी उपचारादरम्यान मध्यरात्री वर्षाचा हिचा मृत्यु झाला. याप्रकरणी संशयित मनोज याच्याविरोधात खुनासह प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. पी. ढोकरे, हवालदार ए.ए. नाईक हे करीत आहेत.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या पोलीस चौकीतील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित मनोज बुधवारी रात्री त्याची पत्नी व मेव्हुण्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन आला. त्यानंतर तो केसपेपर (एमएलसी) करण्यासाठी सिव्हिल पोलीस चौकीत आला असता, त्याने पत्नी पाणी भरण्यासाठी गेली असता, पडल्याने त्यात तिला दुखापत झाल्याचे सांगितले.

तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्षाला तपासून मयत घोषित केले. त्यानंतर संशयित मनोज पुन्हा मेव्हुण्याची केसपेपर घेऊन पोलीस चौकीत आला असता, तो कसा जखमी झाला याची चौकशी केला तेव्हा त्याला काही सांगता येत नव्हते. अखेर पोलिसांनी दोघांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर संशयित मनोजला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने पत्नीसह मेव्हुण्यावर कोयत्याने वार केल्याची कबुली दिली. संशयिताने दोघांना अश्लिल अवस्थेमध्ये पाहिले. त्यानंतर त्याने कोयत्याने पत्नीवर हल्ला चढविला. त्यावेळी ती पळत असताना पडली आणि तिच्या डोक्याला दगडाचाही मार लागला. तर मेव्हुण्यावरही संशयिताने कोयत्याने वार केले. पोलिसांनी सदरची माहिती सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांना दिली. संशयितांने त्यांच्यासमोरही गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर सायखेडा पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली. (Photo संशियीत मनोज पोतदार)

Web Title: Murder of wife through adultery Brother-in-law was also stabbed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here