अहमदनगर: पैशाचा पाऊस पाडणाऱ्या अपहरण झालेल्या युवकाची हत्या
Breaking News | Ahmednagar: कर्जतजवळ सापडला मृतदेह, अपहरण करण्यात आलेल्या पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील दिलीप भिकाजी इंगळे यांची हत्या करण्यात आल्याचे समोर.
अहमदनगर | जानेफळ: पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील अपहरण करण्यात आलेल्या युवकाचा तब्बल १८ दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेत नगर जिल्ह्यात कर्जत नजीक मृतदेह ७ जुलै रोजी आढळला आहे. दिलीप भिकाजी इंगळे असे मृत युवकाचे नाव आहे.
याप्रकरणी जानेफळ पोलिसांनी जानेफळ येथील २ तर सातारा व पुणे जिल्ह्यातील ३ अशा एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. यापैकी दोघांना न्यायालयात हजर केले असताना त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. जानेफळ येथील ज्योती दिलीप इंगळे यांनी जानेफळ पोलीस
स्टेशनला दिलेल्या तक्रारीत अमोल जयसिंग राजपूत व इतरांनी माझे पती दिलीप भिकाजी इंगळे याला पैशाचा पाऊस पाडण्याच्या कामासाठी दि.२२ जून रोजी घरून नेले होते. तसेच रात्री कोकमठाण (तालुका कोपरगाव) येथून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे म्हटले होते. या तक्रारीवरून जानेफळ पोलिसांनी दि.९ जुलै रोजी गुन्हे दाखल केले होते.
दरम्यान, कर्जत तालुक्यातील राशीन जवळील वायसे वाडी परिसरात रस्त्याच्या कडेला एका युवकाचा मृतदेह ७ जुलै रोजी आढळला होता. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून ओळख पटविली असता तो मृतदेह दिलीप इंगळे यांचा असल्याचे १० जुलै रोजी समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ११ जुलै रोजी आरोपी संदीप उर्फ बाबुराव सुभाष शेवाळे (वय २४ वर्ष रा. जानेफळ तालुका मेहकर) योगेश रमेश तोंडे (वय २८ रा. जानेफळ तालुका मेहकर) व बाहेर जिल्ह्यातील ३ जण असे एकूण ५ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या पैकी संदीप सुभाष शेवाळे व योगेश रमेश तोंडे यांना आज दि.११ जुलै रोजी मेहकर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तपासा दरम्यान अपहरण करण्यात आलेल्या पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील दिलीप भिकाजी इंगळे यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
Web Title: Murder of the kidnapped youth who made it rain money
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study