Breaking News | Nevasa: मारहाण करत असलेल्या मुलाला प्रतिकार करताना वडिलांकडून मुलाचा खून झाल्याची घटना. (Murder) खुनाचा गुन्हा दाखल.
नेवासा : मारहाण करत असलेल्या मुलाला प्रतिकार करताना वडिलांकडून मुलाचा खून झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे बुधवारी घडली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. मयत मुलाच्या आईने पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलका दादासाहेब जाधव (रा. गोधेगाव) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगा शिवाजी याला दारूचे व्यसन होते. तो त्याची पत्नी शारदा हिला नेहमी मारहाण करत होता. त्यामुळे शारदा मागील एक वर्षापासून मुलासह माहेरी आहे. १४ मे रोजी सायं. ५:३०च्या सुमारास अलका व दादासाहेब यांना मुलगा शिवाजी
दारू पिऊन शिवीगाळ करत होता. यावेळी शिवाजीने राहिलेली एक एकर जमीन नावावर करून देण्याची मागणी केली. नाही तर ठार मारण्याची धमकी दिली व दादासाहेब यांना मारहाण करू लागला. अलका यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना बाजूला ढकलले. प्रतिकार करताना दादासाहेब यांनी पत्र्याच्या शेडमध्ये असलेली लाकडी फळी शिवाजीच्या डोक्यात मारल्याने गंभीर दुखापत झाली. यामध्ये शिवाजी जाधव याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी दादासाहेब जाधव यास ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे करत आहेत.
Web Title: Murder of son by father
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study