संगमनेर धक्कादायक घटना: पाचशे रुपयांसाठी व्यावसायिकाचा खून
Murder Case: व्यवहारात पाचशे रुपये कमी दिल्याच्या रागातून झालेल्या वादात टुरिस्ट व्यावसायिकाचा खुन केल्याची धक्कादायक घटना, स्वतः वर देखील वार.
घारगाव: क्रुझर गाडी दुरुस्तीसाठी दिल्यानंतर ठरलेल्या व्यवहारात पाचशे रुपये कमी दिल्याच्या रागातून झालेल्या वादात टुरिस्ट व्यावसायिकाचा खुन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा येथे मंगळवार (24 जानेवारी) रात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे टुरिस्ट व्यावसायिकाचा खून केल्यानंतर गॅरेज कामगाराने स्वतःवरही वार करुन घेतल्याचा प्रकार घडला आहे.
विनायक उर्फ संतोष बबन गोडसे (वय 42 रा. पिंपळवंडी) असे खुन झालेल्या टुरिस्ट व्यावसायिकाचे नाव आहे. तर मयुर अशोक सोमवंशी (रा. राजुरी) असे खुन केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात सचिन भिमाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मित्र विनायक उर्फ संतोष बबन गोडसे याची क्रुझर गाडी एक महिन्यापूर्वी दुरुस्तीसाठी पुणे-नाशिक महामार्गावरील हैदरभाई यांच्या गॅरेजवर लावली होती.
गाडी दुरस्ती बिलाच्या 7 हजार 600 पैकी 7 हजार 100 रुपये रोख दिले होते. गॅरेज कामगार मयुर सोमवंशी याला 500 रुपये देणे बाकी होते. उर्वरित 500 रुपयासाठी मयुरने गोडसेकडे फोनवर सारखा तगादा लावला होता. मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आरोपी मयुर सोमवंशी याने संतोष गोडसे यांना फोनवरून शिवीगाळ करत गॅरेजवर ये तुला बघून घेतो अशी धमकी दिली.
Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी
यावेळी संतोष हा लगेच गॅरेजवर आला असता दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला. यातून आरोपी मयुर सोमवंशी याने संतोष गोडसे यांच्या छातीवर हातातील चाकूने वार केले. आणि नंतर स्वतःवरही वार करुन घेतले. त्यानंतर जखमी संतोष गोडसे यांना आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. नंतर त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे नेत असतांना त्यांचा मृत्यू झाला. सचिन जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी मयुर सोमवंशी याच्या विरोधात भादवि कलम 302, 504, 506, 507 प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे करत आहे.
Web Title: Murder of businessman for five hundred rupees
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App