पित्यासमोर निष्पाप तरुणाचा खून; मारेकरी पसार
Breaking News | Nashik Crime: काही सराईतांनी पैशावरून मुद्दाम वाद घालत केलेल्या बेदम मारहाणीत अतिरक्तस्त्रावाने मृत्यू (Death).

नाशिक: वडिलांसमवेत पंचवटीतील बुधवारच्या भाजीपाला बाजारात खरेदीसाठी आलेल्या मुलाचा काही सराईतांनी पैशावरून मुद्दाम वाद घालत केलेल्या बेदम मारहाणीत अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाला. गाडगे महाराज पुलावर सर्वांदेखत हा प्रकार घडला. या घटनेने नागरिक भयभीत झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सीतागुंफा रोडवरील परदेशी भवनात राहणारा नंदलाल ऊर्फ सूरज जगनकुमार दास (१९) हा वडिलांसमवेत बुधवारी आठवडे बाजारात खरेदीसाठी सायंकाळी सातच्या सुमारास आला होता. वडिलांसमवेत गाडगे महाराज पुलासमोरील बाथरूमसमोरून जात असताना गुंडांचे टोळके तेथे आले आणि त्यांनी पैशावरून विनाकारण वाद घातला. दास आणि गुंडांत जोरदार भांडणानंतर टोळक्याने नंदलालवर हल्ला चढवत त्याला रॉडने बेदम मारहाण केली.
महत्वाचे: नवनवीन अधिक बातम्या मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा.
दरम्यान, या मारहाणीत त्याच्या डोक्यात घाव बसून रक्तस्त्राव सुरू झाल्याने जागीच कोसळला व गुंड पळून गेले. वडील जगनकुमार आणि तेथील काही नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जगनकुमार दास यांच्या म्हणण्यानुसार टोळक्याविरुद्ध शहर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतल्याचे कळते.
Breaking News: Murder of an innocent young man in front of his father

















































