रात्री शौचास गेला, तो घरी परतला नाही; नदी पात्रात मृतदेह पाहून कुटुंब हादरलं!
Jalgaon Crime: शौचास गेलेल्या २२ वर्षीय तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना आली समोर.
जळगाव: जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात शुक्रवारी (२३ जून २०२३) रात्री ९ वाजता धक्कादायक घटना घडली. रात्री जेवण केल्यानंतर शौचास गेलेल्या २२ वर्षीय तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या करण्यात आली. हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी धरणगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.
आशिष उर्फ बाळा प्रकाश शिरसाळे (वय, २२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आशिष हा त्याचे आई-वडील आणि मोठ्या भावासह बांभोरी गावातील शनिपेठ भागात राहायला होता. आशिष आणि त्याचा मोठा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. दरम्यान, शुक्रवारी रात्री जेवल्यानंतर आशिष शौचासाठी गावातील गिरणा नदी पात्रात शौचास गेला होता. परंतु, बराच होऊनही आशिष घरी न परतल्याने त्याच्या घरच्यांनी त्याचा शोघ घ्यायला सुरुवात केली. यानंतर आशिष गिरणा नदी पात्रात जखमी अवस्थेत आढळून आला. घरच्यांनी नागरिकांच्या मदतीने त्याला त्वरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत आशिषची डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या करण्यात आली आहे. हत्येचे नेमके कारण समोर आलेलं नसून वैयक्तिक वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. मात्र, या घटनेने बांभोरीसह जळगाव जिल्हा हादरला आहे.
Web Title: Murder Case family was shocked to see the body in the river bed
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App