गौतम अदाणींना मागे टाकत मुकेश अंबानी बनले जगातील सर्वात श्रीमंत भारतीय
Mukesh Ambani overtakes Gautam Adani to become world’s richest Indian.
Mukesh Ambani Richest Indian: भारताचे दिग्गज उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी आता जगातील सर्वात श्रीमंत आशियाई आणि भारतीय व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्स रियल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार मुकेश अंबानींनी गौतम अदाणींना एकूण संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे.
फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी हे ८४.३ बिलियन डॉलर्स एकूण संपत्तीसह 9 व्या क्रमांकावर पोहचले आहेत. तर ८४.१ अब्ज डॉलर्स संपत्तीसह गौतम अदाणी 10 व्या स्थानावर आले आहेत. खरंतर एक दिवस अगोदरच ते या यादीमध्ये अकराव्या स्थानावर होते.
मागील आठवड्यापासून अदाणी समुहाच्या शेअरमध्ये जोरदार विक्री होत आहे. अशा स्थितीत शेअर्समध्ये मोठी घसरण दिसत आहे. यामुळे अदाणींच्या संपत्तीत सातत्याने घट होत आहे.
फोर्ब्सच्या रिअर टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार बर्नाड अरनॉल्ट आणि कुटुंब टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत अव्वलस्थानी आहेत. दुसऱ्या क्रमांकावर इलॉन मस्क, तिसऱ्या स्थानी जेफ बेझोस, चौथ्या क्रमांकावर लॅरी एलिसन, पाचव्या क्रमांकावर वॉरेन बफे, सहाव्या स्थानी बिल गेट्स, सातव्या क्रमांकावर कार्लोस स्लिम हेलू आणि कुटुंब, आठव्या क्रमांकावर लॅरी पेज, यानंतर नवव्या स्थानी मुकेश अंबानी, त्यांच्यानंतर दहाव्या स्थानी गौतम अदाणी आहेत.
Web Title: Mukesh Ambani overtakes Gautam Adani to become world’s richest Indian
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App