अहमदनगर: अल्पवयीन मुलीचा विनयभंग, दुचाकीवर बसवून अश्लील चाळे
Breaking News | Ahmednagar: तरुणाने ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून चालू गाडीवर अश्लिल चाळे करून विनयभंग तरुणावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल.
राहुरी: देवळाली प्रवरा येथील ३५ वर्षीय तरुणाने ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून चालू गाडीवर अश्लिल चाळे करून विनयभंग केला. ही घटना देवळाली प्रवरा येथे घडली आहे. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेतील आरोपी रमेश रामदास चव्हाण याने देवळाली प्रवरा येथील प्रभुजी चौक येथे एका ११ वर्षीय मुलीला बळजबरीने त्याच्या दुचाकीवर बसवले. नंतर आरोपी मुलीला घराच्या दिशेने दुचाकीवर घेऊन जात असताना चालू गाडीवर मुलीचा हात पकडून अश्लिल चाळे केले. तेव्हा मुलीने अमोल कदम यांच्या घरासमोर मोठ्याने ओरडून चालू दुचाकीवरून खाली उडी मारली. त्यानंतर ती रडत घरी पोहचली आणि घरातील लोकांना घडलेला प्रकार सांगितला.
मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी रमेश रामदास चव्हाण (वय ३५) रा. देवळाली प्रवरा याच्यावर भादंवि कलम ३६३, ३५४, ३५४ (अ) तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तात्काळ गजाआड करण्यात आले आहे.
Web Title: Molesting of a minor girl, making her sit on a two-wheeler
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study