१० वीचा पेपर सुटल्यावर अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
राहुरी | Rahuri: जिल्ह्यात मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असून त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित होत आहे. राहुरी तालुक्यात पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले असून त्यातच दहावीचा पेपर देऊन घरी जात असलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला राहुरी तालुक्यातील उंबरे येथे रस्त्यात अडवून तिला लज्जा उत्पन्न होईल (molested), असे वर्तन केले. तसेच जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या नातेवाईकांना मारहाण करण्यात आली. ही घटना दि. 28 मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात उंबरे येथील एका महिलेसह चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरात एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी दि. 28 मार्च रोजी 10 वीचा पेपर देऊन घरी जात होती. यावेळी तिला आरोपी प्रशांत ढोकणे याने रस्त्यात अडवून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या घटनेबाबत त्या मुलीने तिच्या आई-वडिलांना माहिती दिली. त्या मुलीचे नातेवाईक दुसर्या दिवशी दि. 29 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता घटनेचा जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी प्रशांत ज्ञानदेव ढोकणे, कविता ज्ञानदेव ढोकणे, ज्ञानदेव गजानन ढोकणे, सोपान गजानन ढोकणे सर्व रा. उंबरे, ता. राहुरी या चारजणांवर छेडछाड, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. के. नार्हेडा करीत आहेत.
Web Title: molested of a minor student after leaving the paper