अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पाच जणांवर गुन्हा
Ahmednagar News: नगर शहरात ही घटना घडली, विनयभंग (Molestation) व मारहाणीचा गुन्हा दाखल.
अहमदनगर: अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला मारहाण करण्यात आली, तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री नगर शहरात ही घटना घडली असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्षितीज अबनावे, लेखा अबनावे (दोघे रा. मार्केटयार्डच्यापाठीमागे, नगर), गौरव कापरे (भगवानबाबानगर, सारसनगर), प्रेम व तुषार (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गौरव कापरे जून 2020 पासून फिर्यादी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता. क्षितीज अबनावे त्याला मदत करत होता. मंगळवारी रात्री प्रेम व तुषार हे दोघे क्षितीजकडे डब्बा घेण्यासाठी आले होते.
ते फिर्यादीकडे पाहून गौरवला फोन कर असे म्हटले, तेव्हा फिर्यादीने त्यांना थांबण्यास सांगितले असता ते निघून गेले. काही वेळाने क्षितीज व त्याची पत्नी लेखा हातात दांडके घेऊन आली. त्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. माझ्यासोबत गैरवर्तन करून आई-वडिलांनाही मारहाण केली असल्याचे पीडित अल्पवयीन मुलीने फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: Molestation of a minor girl, crime against five people