Home अहमदनगर अल्पवयीन मुलीची छेडछाड, दोघांविरोधात गुन्हा

अल्पवयीन मुलीची छेडछाड, दोघांविरोधात गुन्हा

Breaking News | Jamkhed: अल्पवयीन मुलीस छेडछाड केल्याप्रकरणी येथील दोघांवर जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

Molestation of minor girl, crime against both

जामखेड : अल्पवयीन मुलीस छेडछाड केल्याप्रकरणी येथील दोघांवर जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहबूब गणी शेख (रा. जवळा ता. जामखेड) याच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड पोलिस ठाणे हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला मेहबूब शेख हा मागील एक ते दीड महिन्यापासून त्रास देत होता. सुरुवातीला दुर्लक्ष केल्यानंतरही आरोपीने पीडित मुलीला त्रास देणे सुरूच ठेवल्याने त्रासलेल्या तरुणीने संबंधित बाब आपल्या घरच्यांना सांगितली. त्यानंतर दि. ३१ डिसेंबर रोजी दुपारी शाळा सुटल्यावर पीडित मुलगी व तिची मैत्रीण घरी जात असताना मुलीच्या मागेमागे जात आरोपीने मुलीची छेड काढत, मोटारसायकल आडवी लावली. यावेळी पीडित मुलीने व तिच्या मैत्रिणीने आरडाओरड केल्याने आरोपींनी पळ काढला. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार पीडित मुलीने घरी आल्यावर आपल्या आई-वडिलांना सांगितला त्यानंतर काही जणांनी आरोपीच्या मागावर जाऊन आरोपीस पकडून ठेवले. काही वेळाने याबाबतची माहिती पोलिसांना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत घटनास्थळी संतप्त नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तत्परता दाखवत आरोपी विरोधात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपीस बुधवार रोजी श्रीगोंदा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, सहायक पोलिस निरीक्षक सोनवलकर पुढील तपास करत आहेत.

Web Title: Molestation of minor girl, crime against both

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here