Home अहमदनगर Crime | तरुणीचा विनयभंग, सात जणांवर गुन्हा  

Crime | तरुणीचा विनयभंग, सात जणांवर गुन्हा  

molestation of a young woman, crime against seven people

Shrirampur Crime | श्रीरामपूर : येथील म्हाडा कॉलनी परिसरात एका तरुणीचा विनयभंग (molestation) करण्यात आला. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळनंतर ही घटना घडली.

एक विवाहित महिला व तिची मैत्रीण परिसरात फिरत असताना जावेद शेख नावाचा तरुण तेथे आला. तरुणीचा हात धरून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. यावेळी महिलेने त्यांचा प्रतिकार केला. महिलेचा परिचित तरुण तेथे आला असता आरोपींनी त्यास लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्याचे डोके फोडले. पीडित महिलेने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी जावेद शेख, अल्तमश शेख, महंमद अली पठाण, अंकित मणीयार व अन्य तिघे अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: molestation of a young woman, crime against seven people

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here