Home अहमदनगर महिलेचा विनयभंग, तुझ्या बायकोसोबत रंग खेळायचा असे म्हणत मारहाण

महिलेचा विनयभंग, तुझ्या बायकोसोबत रंग खेळायचा असे म्हणत मारहाण

Molestation of a woman, beating up for playing with your wife

अहमदनगर | Ahmednagar Crime:  दुचाकीवरून जात असणाऱ्या पती-पत्नीचा पाठलाग करून रंग लावण्यासाठी पत्नीची छेड काढणार्‍या दोन मित्रांविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग (Molestation), शिवीगाळ, दमदाटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरात ही घटना घडली.

अमोल साबळे, अक्षय साबळे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

अहमदनगर शहरात राहणार्‍या महिलेने फिर्याद दिली आहे. मंगळवारी रंगपंचमी होती. रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला त्यांच्या पतीसोबत रामवाडीकडून कोठल्याकडे दुचाकीवरून जात असताना अमोल व अक्षय यांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. फिर्यादीकडे पाहून शिट्टी वाजवत, थांब आम्हाला तुला रंग लावायचा आहे, तुझ्यासोबत रंगपंचमी खेळायची आहे, असे म्हणत त्यांचा कोठला स्टँडपर्यंत पाठलाग केला.

तेथे फिर्यादीच्या पतीने दुचाकी थांबविली. अमोल व अक्षय यांना ते म्हणाले, ‘ तुम्ही आमचा पाठलाग का करता, तुम्ही का माझ्या पत्नीला पाहून शिट्टी मारता’, असे विचारल्याचा राग अमोल व अक्षय यांना आल्याने ते फिर्यादीच्या पतीला म्हणाले, आम्हाला तुझ्या बायकोसोबत रंगपंचमी खेळायची आहे, असे म्हणत त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार केरूळकर हे करीत आहेत.

Web Title: Molestation of a woman, beating up for playing with your wife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here