Home अहमदनगर अल्पवयीन आदिवासी मुलीचा विनयभंग, तिच्या कुटुंबियांना मारहाण

अल्पवयीन आदिवासी मुलीचा विनयभंग, तिच्या कुटुंबियांना मारहाण

Molesteation of a minor tribal girl

Ahmednagar | लोणी | Loni:  १२ वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation) करून तिच्या कुटुंबियांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी गोगलगाव येथील आरोपीविरुद्ध लोणी पोलिसांनी विनयभंग व अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करून करण्यात आली  आहे.

बबन सखाराम पडवळ, रा. गोगलगाव, ता. राहाता असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, १२ वर्षीय आदिवासी मुलीचा विनयभंग केला व तिचे वडील आणि चुलते यांनी याबाबत जाब विचारला असता त्यांना बांबू व दगडाने मारहाण (Beaten) करून जखमी केल्याबद्दल आरोपीविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी दुपारी घडल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई केली.

आरोपी बबन पडवळ याच्या विरुद्ध गु.र.नं. 119/2022 भादवि कलम 354, 354(ब), 323, 324, 341,बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12 सह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे सुधारित अधिनियम 2015 चे कलम 3(1)(ु)(ळ)(ळळ) प्रमाणे गुन्हा (Crime Filed) दाखल करून आरोपीला अटक (Arrested) केली.

Web Title: Molestation of a minor tribal girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here