Ahmednagar: अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग
Ahmednagar | राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील एका 14 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलासह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध विनयभंग व पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने देवळाली प्रवरा पालकांकडून चिंता व्यक्त होत आहे. शाळा आणि महाविद्यालयाभोवती फिरणार्या रोडरोेमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
अल्पवयीन शाळकरी मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले, मी देवळाली प्रवरा येथे महाविद्यालयात उन्हाळी क्लासला रोज येत असून काल बुधवारी सकाळी (दि.04) साडेअकराच्या सुमारास क्लास संपल्यानंतर घरी जात असताना शाळेच्या थोड्या अंतरावर तीन मुले माझ्या पाठीमागून जवळ आली. त्यातील एक मुलगा मला नेहमी त्रास देतो. त्यावेळी तो मला म्हणाला, तू थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे. असे म्हणून त्याने लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
त्यावेळी त्याच्यासोबत असणार्या साथीदारांनी तू त्याला फार आवडते, त्याला तुझ्याशी बोलू दे, असे म्हणून त्याची साथ देऊ लागले. त्यावेळी मी तेथून माझी सुटका केली. त्यानंतर घडलेला प्रकार माझे चुलते यांना सांगितला. ते त्या ठिकाणी आल्यानंतर मुले दाखव व तू पुढे चालत जा, असे सांगितले. त्यावर मला त्रास देणारे ते तिघे उभे होते. त्यातील एकास माझ्या चुलत्यांनी पकडले व अन्य दोघे पसार झाले.
याबाबत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून एका अल्पवयीन मुलासह शंकर धोत्रे, राकेश संसारे (पूर्ण नाव माहीत नाही) रा.देवळाली प्रवरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारहेडा करीत आहेत.
Web Title: Molestation of a minor schoolgirl Rahuri