Home अहमदनगर Rape: पहाटे अल्पवयीन मुलीला रेशन दुकानात नेऊन तिच्यावर बलात्कार

Rape: पहाटे अल्पवयीन मुलीला रेशन दुकानात नेऊन तिच्यावर बलात्कार

Ahmednagar Rape Case:  काकडा आरतीला जात असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला रेशन दुकानात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना.

minor girl was taken to a ration shop and rape

श्रीरामपूर | Shrirampur: श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा परिसरात पहाटे काकडा आरतीला गेलेल्या 14 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला रेशन दुकानात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी गणेश बबन जगताप (वय 22) याने मुलगी लहान 14 वर्षाची असतानाही तिला इंस्टाग्राम मोबाईल वर लव यू मेसेज पाठवून पाठलाग केला व पहाटे रेशन दुकानात पकडून नेले व अत्याचार केला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गणेश जगताप याच्याविरुद्ध भादंवि कलम 376 (3) 376 (2) ळ, 354 अ, 354 ड व पोस्को कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी डीवायएसपी संदीप मिटके, सपोनि थोरात यांनी भेट दिली.

Web Title: minor girl was taken to a ration shop and rape

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here