खळबळजनक: दोन सक्ख्या भावांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Pune Crime: १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर पंधरा दिवसांहून जास्त काळ दोघा सख्ख्या भावांनी बलात्कार (rape) केल्याची घटना.
उरुळी कांचन | पुणे: पुणे येथे अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ होत असताना आणखी एक उरुळी कांचन (ता. हवेली) येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर पंधरा दिवसांहून जास्त काळ दोघा सख्ख्या भावांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी इरफान शेख (मुजावर) आणि आयुब शेख (मुजावर) या भावांना अटक केली आहे. मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास पीडित मुलीची आई लघुशंकेसाठी बाहेर आली, त्या वेळी आयुब मुजावर हा मुलीच्या अभ्यासाच्या खोलीच्या बाहेर उभा असलेला त्यांना दिसला त्यांनी खोलीत पाहिले असता खोलीत इरफान मुजावर हा होता.
मुलीच्या आईला पाहिल्यावर ते पळून गेले. आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन हे दोघे गेल्या पंधरा दिवसांपासून या अल्पवयीन मुलीवर वारंवार आळीपाळीने बलात्कार करत होते. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, हे दोघेही आई-वडिलांना ठार मारतील या भीतीने मुलगी हे अत्याचार सहन करत होती. मंगळवारी रात्रीही या दोघांनी आळीपाळीने मुलीवर बलात्कार (Rape) केला असल्याचे पीडित मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. इरफान आणि आयुब शेख या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा (Crime) दाखल केला आहे.
Web Title: minor girl was rape by two Sakhya brothers
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App