Home अहिल्यानगर अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला, आरोपीला अटक

अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला, आरोपीला अटक

Breaking News | Ahilyanagar Crime: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर चाकू हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना.

Minor girl stabbed, accused arrested

शेवगाव : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर चाकू हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शेवगाव शहरात शुक्रवारी सायंकाळी घडली. शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी वेगाने सूत्रे हलवत आरोपीला अटक केली आहे.

पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सदर युवती दुचाकीवर निघाली होती. मागे तिची मैत्रीण दुचाकीवर बसली होती.

या दोघी मोटारसायकलवरून शहरातील कुंभार गल्ली येथून जात असताना सलाउद्दीन हाशमोद्दिन शेख (रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव) व गुलाम गौषकुरेशी (रा. खाटीकगल्ली, शेवगाव) या दोघांनी पीडितेची मोटरसायकल अडविली. यातील दोघी वेगवेगळ्या समाजाचे असल्याच्या संशयावरून सलाउद्दीन शेख याने चाकूने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पीडितेच्या गळ्यावर वार केला. यावेळी युवतीने प्रतिकार केला.

यावेळी तिच्या डाव्या हाताच्या दंडावर गंभीर दुखापत झाली. आरोपींच्या विरोधात विविध कलमांन्वये शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलिस निरीक्षक डी. व्ही. सुदंरडे, प्रवीण महाले, आदिनाथ खेडकर, भगवान सानप, शाम गुंजाळ, देवीदास तांदळे, राहुल आठरे, आदिनाथ शिरसाठ, प्रशांत आंधळे, अस्लम शेख, भारत अंगरखे, दादासाहेब खेडकर आदींनी केली.

दरम्यान या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहेत. मात्र पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली.

दरम्यान, आरोपी सलाउद्दिन शेख हा गुन्हा केल्यानंतर फरार झाला होता. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार भारदे हायस्कूल परिसरात तो लपून बसला होता. त्याप्रमाणे पथक तयार करून रवाना करण्यात आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

Breaking News: Minor girl stabbed, accused arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here