Ahmednagar | Rahuri | राहुरी: राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग (molestation) केल्याची घटना समोर आली आहे. लघुशंकेसाठी घराबाहेर गेलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरुन तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याची घटना १२ मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
14 वर्षीय अल्पवयीन मुलगी स्मशानभूमी येथे लघुशंकेला गेली होती. तेथे आरोपी शिवाजी उत्तम विधाते हा आला. त्याने त्या मुलीचा हात धरुन तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्यावेळी त्या मुलीने जोरजोरात आईला हाक मारली. तिची आई लगेच स्मशानभूमीकडे आली. त्यावेळी तिच्या आईस पाहून आरोपी शिवाजी विधाते हा तेथून पळून गेला. त्यानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ती मुलगी व तिचे आईवडील हे आरोपी शिवाजी विधाते याच्या घरी जाऊन विचारणा केली.
तेव्हा त्याने त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच तुम्ही जर माझे विरुध्द फिर्याद दिली तर तुमचा बेतच पाहील, अशी जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्या मुलीने राहुरी पोलीस ठाण्यात हजर होऊन फिर्याद दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून आरोपी शिवाजी उत्तम विधाते रा. ताहाराबाद ता. राहुरी याच्या विरोधात विनयभंग, मारहाण व जिवे मारण्याची धमकी (molestation, beatings and death threats) दिल्याचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नार्हेडा हे करीत आहेत.
Web Title: Minor girl molestation, beatings and death threats