वडिलांकडे सोडतो सांगत अल्पवयीन मुलीला फसवले, दोन वेळा अत्याचार
Breaking News | Palghar Crime: 15 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार.
पालघर : विरार येथून 15 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपहरण, बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून 20 वर्षीय तरूणाला अटक (arrested) केली आहे.
याबाबत माहिती अशी की, आरोपीने पीडित मुलीला तिच्या वडिलांना ओळखत असल्याचे सांगून तिला वडिलांकडे घेऊन जातो असे सांगून मालाड परिसरात घेऊन आला. मालवणी येथील घरी आरोपीने मुलीवर अत्याचार केले. यात वेदनांनी असह्य झालेल्या मुलीला पुन्हा घरी सोडतो असे सांगून दुचाकीने जंगलात नेले आणि पुन्हा तिच्यावर अत्याचार केले.
याबाबत कोणाला काही सांगितल्यास मुलीला तसेच तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. इतकंच काय तर मुलीची सोशल मिडियावर बदनामी करण्याची धमकी देऊन तिचे व्हिडीओही काढले.
या प्रकारानंतर पीडित मुलीने मालवणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी अपहरण, बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून रविवारी आरोपीला अटक केली. आरोपीसोबत आपली पूर्वीची ओळख नसल्याचा दावा पीडित मुलीने केला आहे. वडिलांचा मित्र असून वडिलांकडे सोडण्याचं आश्वासन देऊन आरोपीने पीडित मुलीला मालाड परिसरात आणल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मालवणी पोलिस पुढील तपास करत आहेत.
Breaking News: Minor girl deceived, raped twice, saying she would leave her