प्रियकराने बोलण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
Breaking News | Pune Suicide: भुलथापा देऊन प्रेमात पाडल्यानंतर प्रियकराने मानसिक त्रास दिल्याने एका १७ वर्षाच्या मुलीने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या.
पुणे : भुलथापा देऊन प्रेमात पाडल्यानंतर प्रियकराने मानसिक त्रास दिल्याने एका १७ वर्षाच्या मुलीने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश पेठकर यांचा भाजीपाला व्यवसाय आहे. पेठकर यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी हिला आरोपी केविन चंदेवळ याने भुलथापा देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मोबाईलच्या माध्यमातून दोघे एकमेकांशी बोलत होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ती तणावात होती. त्यामुळे मोठ्या बहिणीने तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली असता केविनशी वाद झाल्याने तो तिच्याशी बोलत नसल्याचे समोर आले. त्यामुळेच ती तणावाखाली गेली होती.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी केविन चंदेवळ (वय १८, रा. येरवडा) याला अटक केली आहे. ही घटना येरवड्यातील भाजी मार्केट येथील मुलीच्या घरी सोमवारी रात्री दहा वाजता घडली.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी हिला केविन चंदेवळ याने भुलथापा देऊन प्रेमात पाडले. दोघांचे प्रेमसंबंध असताना केविन हा तिला मानसिक त्रास देऊ लागला. त्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले. त्यातूनच तिने सोमवारी रात्री घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे निरीक्षक स्वाती खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके यांनी घटनास्थळाला भेट दिली़ पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून केविन चंदेवळ याला अटक केली आहे. गुन्हे निरीक्षक स्वाती खेडकर तपास करीत आहेत.
Web Title: minor girl commits suicide after her boyfriend refuses to talk
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study