Home अहिल्यानगर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुत्रासह अमित शाहांच्या भेटीला; सुजय विखे पाटलांची केंद्रात...

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुत्रासह अमित शाहांच्या भेटीला; सुजय विखे पाटलांची केंद्रात वर्णी लागणार?

Breaking News | Radhakrishna Vikhe Patil: माजी खासदार सुजय विखे यांनी  पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यामुळे आता सुजय विखे पाटलांची केंद्रात वर्णी लागणार का? आणि त्या अनुषंगानेचं ही भेट होती का? अशा चर्चा रंगू लागल्या.

Minister Radhakrishna Vikhe Patil with son Amit Shahnchya Bhetila

नवी दिल्ली: राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अहिल्यानगर येथील भाजपचे माजी खासदार सुजय विखे  यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी अमित शाह यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतलीय. या भेटीत अहिल्यानगरच्या लोणी बुद्रुक येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरणासाठी अमित शाह यांना निमंत्रित करण्यासाठी ही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सोबतच, नवीन गाळप हंगाम सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून एन.सी.डी.सी. लोनमुळे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर या कारखान्याचे नूतनीकरण करण्यात यावं, अशी मागणीही यावेळी करण्यात आल्याचे सांगितलं जातंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रमुख उपस्थिती लाभावी अशी विनंतीही यावेळी विखे पिता पुत्राने केली आहे. शिवाय अमित शाह यांनी देखील दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबद्दल सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले अहिल्यानगर येथील भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी वेळोवेळी आपल्या पुनर्वसनाची मागणी केली आहे. नुकतेच नगर शहरात भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच नवंनिर्वाचित आमदारांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या सत्कार समारंभासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह महायुतीच्या दहा पैकी आठ आमदारांनी हजेरी लावली. या सत्कारसमारंभामध्ये माजी खासदार सुजय विखे यांनी  पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यामुळे आता सुजय विखे पाटलांची केंद्रात वर्णी लागणार का? आणि त्या अनुषंगानेचं ही भेट होती का? अशा चर्चा रंगू लागल्या आहे.

Breaking News: Minister Radhakrishna Vikhe Patil with son Amit Shahnchya Bhetila

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here