Milka Singh: भारताचे महान धावपटू मिल्का सिंग यांचे निधन
Milka Singh Dies: भारताचे माजी धावपटू मिल्का सिंग यांचे निधन झाले आहे. मिल्का सिंग यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे गेल्या काही दिवसांत हॉस्पिटलकडून सांगण्यात आले होते. पण आज मिल्का सिंग यांची मृत्यूची बातमी आली आहे.
काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते .राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिल्खा सिंग यांनी जिंकून दिले होते. भारताचा पद्मश्री हा किताब देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मोहाली येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मिल्खा सिंग यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.भारताचे पंतप्रधान यांनी ट्वीट करून मिल्का सिंग यांच्या निधनाबाबत दुख व्यक्त केले आहे.
Web Title: Milka Singh Dies