संगमनेर धक्कादायक घटना: मध्यरात्री कोपीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्याने नेले ओढून
Sangamner Bibatya Attack: कोपीत झोपलेल्या चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला करत ओढून नेल्याची दुर्दैवी घटना.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातील मोठेबाबा परिसरात गुरुवारी मध्यरात्री धक्कादायक घटना घडली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आई वडीलासमवेत कोपीत झोपलेल्या चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला करत ओढून नेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऊस तोड मंजूर बिबट्यामागे पळाल्यामुळे या चिमुकल्याला बिबट्याच्या जबड्यातून सोडवण्यात यश आले असले तरी या चिमुकल्याची प्रकृती चितांजनक असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, साखर कारखाने सुरु झाल्यामुळे आश्वी खुर्द शिवारातील मोठेबाबा येथील लक्ष्मीमाता मंदिराजवळ जळगाव येथून आलेले संगमनेर साखर कारखान्याचे ऊस तोड मंजूराचे २० कुटुंब अड्डा करुन राहत आहेत. गुरुवारी हे ऊस तोड मंजूर आपल्या कोप्यामध्ये झोपलेले असताना मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास आधाराचा फायदा घेत बिबट्याने ऊस तोड मंजूराच्या कोपीत निर्धास्त झोपलेला चिमुकला विरु अजय पवार (वय ३ वर्ष) याला जबड्यात घेऊन शंभर ते दिडशे फुटावर पलायन केले.
त्यामुळे चिमुकला जोरात ओरडल्यामुळे आई वडीलासह शेजारील ऊस तोड मंजूरानी या बिबट्याचा थरारक पाठलाग करत त्याच्या जबड्यातून या चिमुकल्याची सुटका केली. या चिमुकल्याच्या मानेवर खोलवर जखमा झाल्यामुळे मोठा रक्तस्राव होत असल्याने त्याला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र चिमुकल्याची प्रकृती खालवत असल्याने पहाटे ४ वा. त्याला नगर येथिल सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान मागील अनेक वर्षापासून प्रवरा नदी तिरावरील गावानमध्ये बिबट्याचा हैदोस सुरु असून शेतकऱ्याच्या पशुधनासह नागरीकावर प्राणघातक हल्ले होत आहेत. परंतू कोणत्याही उपाययोजना वनविभागाकडून केल्या जात नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत.
वन विभागाकडून कोणत्याही आश्वासक उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यामधून संताप व्यक्त होत आहे. बिबटे जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी यानिमित्ताने आश्वी सह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली आहे.
Web Title: middle of the night, a sleeping baby was dragged away by a Bibatya attack
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App