Home परभणी एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वेसमोर आत्महत्या, खळबळजनक कारण आलं समोर

एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वेसमोर आत्महत्या, खळबळजनक कारण आलं समोर

Breaking News | Suicide Case: एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वे रूळावर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे गूढ उलगडले असून खळबळजनक कारण समोर आलं.

members of the same family committed suicide in front of the train, the sensational reason came to light

परभणी: परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरामधील एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वे रूळावर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे गूढ उलगडले असून खळबळजनक कारण समोर आलं आहे. तुमच्या मुलीचे माझ्यासोबत लग्न लावून द्या. अन्यथा तिचे व्हिडिओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी ब्लॅकमेलिंग करून धमकी तरूणानं दिल्यानं त्रासाला कंटाळून कुटुंबानं आत्महत्या केली आहे. कुटुंबानं बदनामीपेक्षा मृत्यूला कवटाळल्याचे यातून पुढं आलं आहे. आरोपी युवकास गंगाखेड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल केला आहे.

28 नोव्हेंबरला दुपारी गंगाखेड शहराच्या नजीक असलेल्या धारखेड शिवारात रेल्वे रूळावर ममता माध्यमित विद्यालयातील शिक्षक मसनाजी तुडमे, त्यांच्या पत्नी रंजना आणि मुलगी अंजली यांनी सामूहिक आत्महत्या केल्याच्या घटनेने गंगाखेडमध्ये खळबळ उडाली होती. या घटनेनंतर जिल्ह्यासह राज्यात विविध तर्क काढण्यात येते होते.

Web Title: members of the same family committed suicide in front of the train, the sensational reason came to light

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here