Crime: विवाहितेचा छळ: सात जणांवर गुन्हा दाखल
श्रीरामपूर | Shrirampur Crime: सासरी नांदत असताना विवाहीतेला तुझ्या वडीलांनी लग्नात हुंडा व गाडी दिली नाही व मानपान केले नाही, असा वारंवार आरोप करीत पतीने मारहाण करुन, मानसिक छळ करुन, शिवीगाळ करीत असल्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती, सासु, सासरे, नंणद व त्यांचे पती, चुलत सासरे, सासु यांचेविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर येथील प्रणिता अनिकेत शियाळ (रा. महेंद्रनगर, ता. करमाळा) या विवाहीतेने श्रीरामपूर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. माझा विवाह 28 एप्रिल 2019 रोजी अनिकेत शियाळ यांचे बरोबर झाला. पती इनफोसेस कंपनीत नोकरीस (Infosys Company job) असुन त्याची करमाळा येथे गॉसरी पॅकेजींग फॅक्टरीही आहे. माझ्या वडिलांनी साई गोल्ड पॅलेस शिर्डी येथे थाटामाटात विवाह करुन दिला. लग्नात हुड्यांपोटी सुमारे 8 लाखाचे सोने-चांदीचे दागिने व भेट वस्तु दिल्या.
लग्नानंतर एक महिन्यानंतर सासु ज्योती नितीन शियाळ हिने माहेरी श्रीरामपूरला आई वडिलांना फोन करुन म्हणाली की, तुम्ही लग्नात मानपान केले नाही. हुंडा व गाडी दिली नाही, असे म्हणत मागणी केली. माहेरहुन हुंडा व गाडी आणत नाही म्हणून आरोपी पती अनिकेत नितीन शियाळ, सासु ज्योती नितीन शियाळ, सासरे नितीन जीवन शियाळ, चुलत सासरे राजेंद्र जीवन शियाळ, चुलत सासु वैशाली राजेंद्र शियाळ (रा. करमाळा) नणंद अनुप्रिता तुषार बोरा, तुषार हुकुमचंद बोरा (जामखेड, हल्ली रा. बानेर, बालेवाडी रोड, पुणे) यांनी वडीलांकडून कार व 10 लाख रुपये घेवुन ये, अशी मागणी केली. माहेरहुन आणत नाही म्हणुन शिवीगाळ करुन, मारहाण करुन, उपाशी ठेवुन मानसीक छळ दिला तसेच माझे श्रीधन त्यामध्ये सोने-चांदीचे दागिने व माझ्या संसार उपयोगी सामान दिले नाही. मला घरातुन हाकलुन दिले, म्हणुन हल्ली माहेरी राहत आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीवरून पोलिसांनी पती, सासु, सासरे, चुलत सासरे, चुलत सासु, नणंद, जावई आदि Crime दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल भरत पंडित हे करीत आहेत.
Web Title: Marital harassment Crime filed against seven persons